Exit Load: म्युच्युअल फंडामधील एक्झिट लोडचा अर्थ काय आहे?

Exit Load Meaning in Marathi: म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना अनेक गुंतवणूकदार Exit Load या संकल्पनेला दुर्लक्ष करतात. पण Mutual Fund Exit Load हा गुंतवणुकीच्या परताव्यावर..

Exit Load Meaning in Marathi

Exit Load Meaning in Marathi: म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना अनेक गुंतवणूकदार Exit Load या संकल्पनेला दुर्लक्ष करतात. पण Mutual Fund Exit Load हा गुंतवणुकीच्या परताव्यावर थेट परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. Exit Load म्हणजे ठराविक कालावधीपूर्वी गुंतवणूक काढल्यास आकारला जाणारा शुल्क.

प्रत्येक म्युच्युअल फंड योजनेच्या Scheme Information Document मध्ये Exit Load आणि त्याचा कालावधी स्पष्ट दिलेला असतो. उदाहरणार्थ, एखाद्या इक्विटी फंडमध्ये 12 महिन्यांपूर्वी पैसे काढल्यास 1 टक्का Exit Load लागू होऊ शकतो.

Exit Load का आकारला जातो?

Asset Management Company म्हणजे AMC Exit Load आकारण्यामागे दोन मुख्य कारणे आहेत. पहिले म्हणजे गुंतवणूकदारांनी लवकर पैसे काढू नयेत आणि दीर्घकालीन गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळावे. दुसरे म्हणजे, मोठ्या प्रमाणात रिडेम्प्शन झाल्यास फंडाच्या Asset Under Management म्हणजे AUM वर परिणाम होतो, ज्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांच्या परताव्यावर परिणाम होऊ शकतो.

हेही वाचा: म्युच्युअल फंडमध्ये NAV म्हणजे काय?

Exit Load कसा मोजला जातो?

लंपसम गुंतवणूक उदाहरण

समजा तुम्ही ₹1,00,000 इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले आणि Exit Load 1 टक्का आहे. जर तुम्ही 12 महिन्यांपूर्वी पैसे काढले तर Exit Load हा सध्याच्या मूल्यावर आकारला जातो, मूळ गुंतवणुकीवर नाही. म्हणजे जर तुमची गुंतवणूक वाढून ₹1,20,000 झाली असेल, तर 1 टक्का Exit Load म्हणजे ₹1,200 वजा होईल आणि तुम्हाला ₹1,18,800 मिळतील. जर 12 महिन्यांनंतर रिडेम्प्शन केले तर Exit Load लागू होत नाही.

SIP गुंतवणूक उदाहरण

Systematic Investment Plan मध्ये Exit Load थोडा वेगळा मोजला जातो. प्रत्येक हप्त्यावर स्वतंत्रपणे होल्डिंग पिरियड लागू होतो. समजा तुम्ही दरमहा ₹10,000 SIP करत आहात आणि 6 महिन्यांत ₹60,000 गुंतवले. जर तुम्ही 12 महिन्यांपूर्वी रिडेम्प्शन केले, तर प्रत्येक हप्त्यावर Exit Load लागू होईल. परंतु जर तुम्ही 12 महिन्यांनंतर पैसे काढले, तर पहिल्या हप्त्यावर Exit Load लागू होणार नाही, कारण त्याचा कालावधी पूर्ण झाला असेल. उर्वरित हप्त्यांवर मात्र Exit Load लागू होऊ शकतो.

गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे मुद्दे

Exit Load in Mutual Fund हा गुंतवणुकीचा एक महत्त्वाचा भाग आहे. Mutual Fund Investment करताना Exit Load, Lock in Period आणि Redemption Rules नीट समजून घेणे आवश्यक आहे. यामुळे अनावश्यक शुल्क टाळता येते आणि योग्य परतावा मिळू शकतो. Mutual Fund Exit Load Calculation समजून घेतल्यास तुम्ही योग्य वेळी रिडेम्प्शन करून तुमचा नफा वाढवू शकता. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी Scheme Information Document काळजीपूर्वक वाचणे अत्यंत आवश्यक आहे.

रोजच्या आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या फायनान्स अपडेट्ससाठी जॉइन मराठी फायनान्स न्यूज – Whats App

About the Author

Sajan Bhuvad Avatar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *