HDFC Bank च्या शेअरमध्ये १५% घसरण – शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड गुंतवणुकीवर मोठा परिणाम होणार का?

HDFC Bank shares मार्च २०२६ मध्ये तब्बल १५% पेक्षा जास्त कोसळले आहेत. बँकेचे non-executive chairman अतनू चक्रवर्ती यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर हे संकट सुरू झाले…

HDFC Bank Share in Marathi

HDFC Bank shares मार्च २०२६ मध्ये तब्बल १५% पेक्षा जास्त कोसळले आहेत. बँकेचे non-executive chairman अतनू चक्रवर्ती यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर हे संकट सुरू झाले. या घसरणीचा परिणाम NIFTY50, NIFTY Bank index आणि लाखो mutual fund गुंतवणूकदारांवर झाला आहे.

HDFC Bank मध्ये नक्की काय घडले?

१८ मार्च २०२६ रोजी HDFC Bank चे part-time chairman अतनू चक्रवर्ती यांनी “values and ethics” वरील मतभेदांचे कारण देत अचानक राजीनामा दिला. त्यानंतर Reserve Bank of India च्या मंजुरीने HDFC Bank Group चे ज्येष्ठ अधिकारी केकी मिस्त्री यांची interim chairman म्हणून नियुक्ती करण्यात आली.

या घटनेनंतर १९ मार्च रोजी HDFC Bank share price तब्बल ५.३२% घसरला, तर NIFTY50 index त्याच दिवशी ३.२६% खाली आला.

त्यानंतर आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली. बँकेने Credit Suisse च्या Additional Tier 1 Bonds च्या mis-selling प्रकरणात कथित सहभागासाठी तीन senior executives ना नोकरीवरुण काढून टाकले. या बातमीनंतर २३ मार्च रोजी stock आणखी ४.१% घसरून ₹७४५.७ च्या 52-week low वर आला.

गेल्या चार सत्रांतील घसरण:

तारीखHDFC BankNIFTY50NIFTY Bank
१९ मार्च▼ ५.३२%▼ ३.२६%▼ ३.३९%
२० मार्च▼ २.२२%+०.४%▼ ०.०४%
२३ मार्च*▼ ४.१%▼ २.३%▼ ३.४%

*दुपारी ३:०० वाजेपर्यंतची आकडेवारी

या चार सत्रांमध्ये HDFC Bank चे market capitalisation तब्बल ₹१.३५ लाख कोटींनी घटून ₹११.४८ लाख कोटींवर आले आहे.

HDFC Bank शेअर बाजारासाठी इतका महत्त्वाचा का आहे?

१. NIFTY50 आणि NIFTY Bank मधील उच्च weightage

HDFC Bank हा NIFTY50 index मधील सर्वाधिक weightage असलेल्या stocks पैकी एक आहे. free float market capitalisation नुसार, HDFC Bank चा NIFTY50 मध्ये ११.८३% तर NIFTY Bank index मध्ये १९.६९% वाटा आहे.

याचाच अर्थ असा की —

  • HDFC Bank मध्ये १% घसरण झाली तर NIFTY50 साधारण २२ ते २५ points खाली येतो.
  • NIFTY Bank मध्ये त्याच घसरणीमुळे जवळपास १०० ते १०५ points ची घट होते.

गेल्या काही सत्रांतील १५% घसरणीमुळे NIFTY50 मध्ये अंदाजे ३३० ते ३७५ points आणि NIFTY Bank मध्ये १,५०० ते १,५७५ points ची घट होऊ शकते.

२. Mutual Funds मध्ये मोठी गुंतवणूक

HDFC Bank हा भारतातील mutual funds मध्ये सर्वाधिक ठेवल्या जाणाऱ्या stocks पैकी एक आहे. डिसेंबर २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, mutual funds कडे HDFC Bank मधील तब्बल २६.६% हिस्सा आहे. ७४० पेक्षा जास्त schemes या stock मध्ये गुंतवणूक करतात.

HDFC Bank exposure असलेल्या प्रमुख Mutual Fund Schemes:

Fund चे नावExposure
Parag Parikh Large Cap९.७७%
Mirae Asset Large Cap९.५४%
DSP Large Cap९.३८%
Tata Large & Mid Cap९.३८%
Parag Parikh Flexi Cap७.७३%
Franklin India Flexi Cap८.४६%

(AMFI फेब्रुवारी २०२६ डेटानुसार)

या funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या NAV वर अल्पकाळासाठी परिणाम होऊ शकतो. मात्र mutual funds diversified असल्याने दीर्घकालीन दृष्टिकोनातून हे नुकसान कायमस्वरूपी नाही. बाजारात सुधारणा झाल्यास NAV पुन्हा सुधारेल.

३. FIIs चा मोठा सहभाग

डिसेंबर २०२५ नुसार, Foreign Institutional Investors (FIIs) कडे HDFC Bank चा तब्बल ४७.७% हिस्सा आहे. जुलै २०२५ पासून FIIs भारतीय बाजारात net sellers आहेत आणि मार्च २०२६ मध्ये त्यांनी आतापर्यंत ₹८६,७८० कोटींचे shares विकले आहेत.

HDFC Bank च्या stock मधील तीव्र घसरणीमुळे या परदेशी गुंतवणूकदारांचे notional losses मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

गुंतवणूकदारांनी काय करावे?

गुंतवणूकदारांनी मार्च ३१ नंतर जाहीर होणाऱ्या Q4 FY26 shareholding pattern वर लक्ष ठेवावे. यातून mutual funds आणि FIIs च्या holdings बद्दल अधिक स्पष्टता मिळेल. सध्याची परिस्थिती अल्पकालीन volatility असली, तरी HDFC Bank च्या भवितव्याबाबत बाजाराची प्रतिक्रिया येणाऱ्या काही आठवड्यांत अधिक स्पष्ट होईल.

वाचा: आज सोन्याचे दर घसरले! २३ मार्च २०२६ चे संपूर्ण भाव जाणून घ्या | Gold Rate Today in Marathi

टीप: हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने आहे. हे कोणत्याही प्रकारचे investment advice नाही.

About the Author

Sajan Bhuvad Avatar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Have Missed