RBI Bank Account Portability: भारतातील कोट्यवधी बँक खातेदारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने ‘पेमेंट्स व्हिजन 2028’ या नव्या धोरणांतर्गत बँक खाते पोर्टेबिलिटीची सुविधा सुरू करण्याची तयारी केली आहे. यामुळे ग्राहकांना बँकिंग सेवा बदलणे मोबाइल नेटवर्क बदलण्याइतके सोपे होणार आहे.
बँक खाते पोर्टेबिलिटी म्हणजे काय
सध्या एखाद्या बँकेची सेवा खराब असेल किंवा शुल्क जास्त असेल तर ग्राहकाला नवे खाते उघडावे लागते. यात वेळ, पैसा आणि कागदपत्रांचा मोठा त्रास होतो. आरबीआयच्या नव्या पोर्टेबल बँक खाते धोरणानुसार आता हे सर्व बदलणार आहे. ग्राहकाचा खाते क्रमांक, रक्कम आणि सर्व व्यवहारांचा इतिहास जसाच्या तसा राहील. फक्त बँकेचे नाव बदलेल. बँक बदलताना कोणताही दंड किंवा अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. मात्र कर्ज किंवा थकबाकी असल्यास ती आधी चुकवावी लागेल.
PaSS प्रणाली कशी काम करेल
आरबीआयने यासाठी ‘पेमेंट्स स्विचिंग सर्व्हिस’ म्हणजेच PaSS ही विशेष डिजिटल प्रणाली तयार केली आहे. ही प्रणाली एका Super App प्रमाणे काम करेल. यात ग्राहकाची सर्व बँक खाती एकाच ठिकाणी दिसतील आणि एका क्लिकवर बँक बदलता येईल. बँक बदलल्यानंतरही UPI, ऑनलाइन पेमेंट, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड पूर्वीप्रमाणेच सुरळीत चालू राहतील. ग्राहकांची रोजची बँकिंग प्रक्रिया यामुळे खूपच सोपी होणार आहे.
ग्राहकांना काय फायदे मिळणार
पोर्टेबल बँक खाते सुविधेमुळे बँकांमध्ये चांगली सेवा देण्याची निकोप स्पर्धा निर्माण होईल. जास्त शुल्क आकारणाऱ्या किंवा खराब सेवा देणाऱ्या बँका आपोआप सुधारतील कारण ग्राहक सहज दुसऱ्या बँकेत जाऊ शकतो. छोट्या बँका आणि नव्या बँकांनाही यामुळे बाजारात संधी मिळेल. एकूणच डिजिटल बँकिंग सुरक्षा आणि ग्राहक संरक्षण यांना यामुळे बळकटी येईल.
आंतरराष्ट्रीय पैसे पाठवणे सोपे होणार
आरबीआयने आंतरराष्ट्रीय पैसे पाठवण्याची प्रक्रियाही सुलभ केली आहे. जटिल कागदपत्रे आणि प्रक्रिया कमी होतील. मोबाइल App वरून परदेशी पैसे पाठवणे शक्य होईल. सेंट्रल बँक डिजिटल करन्सी म्हणजेच CBDC च्या वाढत्या वापरामुळे आंतरराष्ट्रीय व्यवहार अधिक जलद आणि स्वस्त होतील. व्यापारी, विद्यार्थी आणि परदेशात जाणाऱ्या प्रवाशांना यायाचा मोठा फायदा होणार आहे.
ई-चेकबुक येणार
चेक प्रणालीतही आमूलाग्र बदल होणार आहे. लवकरच ई-धनादेश म्हणजेच ई-चेक सुविधा सुरू होणार आहे. यामुळे फिजिकल चेकबुकची गरज राहणार नाही. ई-चेक सुरक्षित, तत्काळ आणि विनाखर्च असेल. फसवणुकीचा धोका यामुळे मोठ्या प्रमाणात कमी होईल.
आरबीआयचे पेमेंट्स व्हिजन 2028 हे धोरण भारतातील बँकिंग क्षेत्रात खऱ्या अर्थाने डिजिटल क्रांती घडवणार असून सामान्य नागरिकांच्या आर्थिक जीवनात मोठा सकारात्मक बदल आणणार आहे.
रोजच्या आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या फायनान्स अपडेट्ससाठी जॉइन मराठी फायनान्स न्यूज – Whats App