Investing Mistakes in Marathi: बाजार पडला म्हणून पैसे गेले असं नेहमी होत नाही. अनेकदा तुमच्याच छोट्या सवयी ज्या तुम्हाला चुकीच्याही वाटत नाहीत पण त्याच तुमची संपत्ती हळूहळू कमी होत जाते.
तुम्ही portfolio नियमित तपासता, market च्या बातम्या वाचता, buy sell चे निर्णय घेता. सगळं योग्यच वाटतं. पण हेच तुम्हाला मागे ओढत असेल तर?
Fortuna Asset Managers चे Partner Jayant Manglik यांच्या मते, गुंतवणूकदारांचा खरा शत्रू बाजारातील चढउतार नाही, तर त्यांचं स्वतःचं वर्तन आहे. आणि त्यांनी अशा तीन सवयी सांगितल्या ज्या सर्वाधिक नुकसान करतात.
1. activity म्हणजे investing नाही | Overtrading Problem
सतत stocks track करणं, profits book करणं, funds बदलणं. यात एक वेगळाच आनंद असतो. पण हा आनंद बऱ्याचदा फसवा असतो. Manglik सांगतात, “अनेक गुंतवणूकदार वारंवार खरेदी विक्री करणं म्हणजे smart investing समजतात. प्रत्यक्षात overtrading मुळे transaction costs, tax आणि emotional decisions यांमुळे wealth कमी होते.”
Trading apps मुळे आता एका क्लिकवर व्यवहार होतात. त्यामुळे discipline राखणं आधीपेक्षा कठीण झालं आहे. जे agility वाटतं ते बहुतेकदा impulsive decisions असतात. “जर churn मुळे दरवर्षी फक्त 2 ते 3% drag आला, तर 15 ते 20 वर्षांत compounding च्या परिणामाने corpus 25 ते 30% कमी होऊ शकतो,” असं Manglik सांगतात.
Long term wealth speed ने नाही, patience ने बनतं.
2. एकाच ठिकाणी सगळी गुंतवणूक | Concentration Risk आणि Diversification
एखादा sector तेजीत असताना तिथेच सगळं ओतण्याचा मोह होतो. Midcap surge होतो, thematic funds चमकतात, gold वाढतो. आणि concentration म्हणजे conviction वाटू लागतं. पण इथेच सापळा आहे. “Recency bias मुळे गुंतवणूकदार अलीकडील returns कायमच राहतील असं मानू लागतात,” असं Manglik स्पष्ट करतात.
“Concentration risk bull market मध्ये दिसत नाही. ती Corrections मध्ये एकदम समोर येते.” एकाच idea वर केंद्रित portfolio काही काळ चांगला दिसतो, पण नंतर एकाच धक्क्यात सगळं कोसळू शकतं.
Manglik यांच्या मते balance हे brilliance पेक्षा महत्त्वाचं आहे. “Equity, debt आणि gold मध्ये diversified portfolio, long term returns न सोडता volatility कमी करतो.” ते आवर्जून सांगतात. “Stock selection पेक्षा asset allocation हे long term outcomes जास्त ठरवतं.”
3. ‘योग्य वेळे’ची वाट पाहणं | Timing the Market vs Time in the Market
हे जवळपास प्रत्येक गुंतवणूकदाराने केलेलं असतं. वाट पाहणं. Market खाली येईल, valuations सुधारतील, elections संपतील, global situation स्पष्ट होईल… मग गुंतवणूक करू. हे तर्कसंगत वाटतं. पण काम करत नाही. “अनेक गुंतवणूकदार corrections, elections किंवा global cues ची वाट पाहत idle savings ठेवतात,” असं Manglik सांगतात.
थांबण्याची किंमत नेहमी दिसत नाही, पण ती असते. बाजाराचे सर्वोत्तम काही दिवस miss झाले तरी returns वर मोठा परिणाम होतो. “Decades चा data सांगतो की market मध्ये वेळ घालवणं, market timing करण्यापेक्षा नेहमी फायदेशीर आहे,” असं ते सांगतात. तोपर्यंत idle cash चं मूल्य inflation मुळे हळूहळू कमी होत राहतं.
SIP सारखं structured investing हा एक व्यावहारिक उपाय आहे. Timing चा धोका कमी होतो आणि consistency येते.
खरा धोका बाजार नाही, तुम्ही आहात | Behavioural Finance
या तीन सवयींपैकी एकही सवय चुकीची वाटत नाही जेव्हा आपण ती करतो. उलट त्या logical, अगदी disciplined वाटतात. पण दहा वीस वर्षांत त्या तुमच्या wealth चा मोठा हिस्सा गप्पचूप खाऊन टाकतात.
म्हणूनच Manglik एकाच वाक्यात सांगतात. “Investing मधला सर्वात मोठा धोका बाहेरून नाही, तो तुमच्या स्वतःच्या वर्तनातून येतो.” कारण यशस्वी investing म्हणजे जास्त करणं नाही. कमी करणं, consistent राहणं, आणि वेळ व compounding ला काम करू देणं. हेच खरं investing आहे.