8th Pay Commission: १.१० कोटी कर्मचाऱ्यांच्या पगारात ३४ टक्के वाढ होणार, पण ‘ही’ एक अट आहे!

देशभरात 8th Pay Commission बाबत चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक आपल्या पगार आणि पेन्शनमध्ये वाढ होण्याची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत…

8th Pay Commission Update in Marathi

देशभरात 8th Pay Commission बाबत चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक आपल्या पगार आणि पेन्शनमध्ये वाढ होण्याची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. या आयोगाच्या शिफारसींमुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

आयोगाची स्थापना आणि कालावधी

अर्थ मंत्रालयाने संसदेत याला दुजोरा दिला असून, सरकारने ३ नोव्हेंबर २०२५ रोजी आठव्या केंद्रीय वेतन आयोगाची अधिकृत स्थापना केली आहे. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की, 8th central pay commission आपल्या स्थापनेपासून १८ महिन्यांच्या आत वेतन, भत्ते आणि निवृत्तीवेतन या विषयांवर शिफारसी सादर करेल. त्यानुसार आयोगाच्या शिफारसी जून २०२७ पर्यंत प्रसिद्ध होण्याची अपेक्षा आहे.

पगारात किती वाढ होणार?

माध्यमांतील वृत्तांनुसार, 8th pay commission salary hike ३० ते ३४ टक्क्यांपर्यंत असण्याची शक्यता आहे. या वाढीचा थेट लाभ १.१० कोटींहून अधिक कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना मिळणार आहे. त्यात सुमारे ४९ लाख कार्यरत कर्मचारी आणि ६८ लाख निवृत्त कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

हेही वाचा: ITR Filing 2026: आयटीआर कधीपासून भरता येणार? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती!

फिटमेंट फॅक्टर काय आहे?

या वाढीचे केंद्रबिंदू म्हणजे fitment factor 2.57. फिटमेंट फॅक्टर हा कर्मचाऱ्याचा मूळ पगार निश्चित करण्यासाठी वापरला जाणारा गुणक आहे. आयोग हा फिटमेंट फॅक्टर २.५७ इतका निश्चित करण्यावर विचार करत असल्याचे वृत्त आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा सध्याचा मूळ पगार १८,००० रुपये असेल आणि त्याला २.५७ चा fitment factor लागू केला, तर नवीन पगार अंदाजे ४६,२६० रुपये इतका होऊ शकतो. फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ झाल्यास मूळ पगारासोबतच महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता यांसारख्या इतर भत्त्यांमध्येही आपोआप वाढ होईल.

अंमलबजावणी कधी होणार?

central government employees salary साठी महत्त्वाची बाब म्हणजे, या शिफारसींची प्रभावी तारीख १ जानेवारी २०२६ मानण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्ष वाढीव रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी आर्थिक वर्ष २०२६ २७ उजाडण्याची शक्यता आहे. मागील वेतन आयोगांप्रमाणेच यावेळीही अहवाल सादर होणे आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यांमध्ये काही कालावधीचे अंतर राहण्याची शक्यता आहे. मात्र असा विलंब झाल्यास कर्मचाऱ्यांना थकीत रकमेची एकरकमी रक्कम अदा केली जाईल, जो त्यांच्यासाठी मोठा आर्थिक दिलासा ठरेल.

निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ

government employee pension hike बाबत बोलायचे झाल्यास, प्रत्येक वेतन आयोगाप्रमाणे यावेळीही पगारासोबत निवृत्तीवेतनातही वाढ होण्याची अपेक्षा आहे. यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांनाही मोठा दिलासा मिळण्याचे संकेत आहेत. एकूणच, ८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा एक ऐतिहासिक निर्णय ठरू शकतो.

रोजच्या आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या फायनान्स अपडेट्ससाठी जॉइन मराठी फायनान्स न्यूज - Whats App

About the Author

Sajan Bhuvad Avatar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *