Parag Parikh Flexi Cap Fund Review: 18% परतावा देणारा हा फंड अजूनही बेस्ट आहे का?

Parag Parikh Flexi Cap Fund review 2026: पराग पारीख फ्लेक्सी कॅप फंड हा भारतातील सर्वात विश्वासार्ह आणि लोकप्रिय म्युच्युअल फंडांपैकी एक आहे. PPFAS म्युच्युअल फंड..

Parag Parikh Flexi Cap Fund review 2026 in Marathi

Parag Parikh Flexi Cap Fund review 2026: पराग पारीख फ्लेक्सी कॅप फंड हा भारतातील सर्वात विश्वासार्ह आणि लोकप्रिय म्युच्युअल फंडांपैकी एक आहे. PPFAS म्युच्युअल फंड या AMC द्वारे व्यवस्थापित हा फंड दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी एक उत्तम पर्याय मानला जातो. जर तुम्ही एक शिस्तबद्ध, पारदर्शक आणि value investing तत्त्वावर चालणाऱ्या फंडाच्या शोधात असाल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे.

Flexi Cap Fund हा असा म्युच्युअल फंड आहे जो Large Cap, Mid Cap आणि Small Cap कंपन्यांमध्ये मुक्तपणे गुंतवणूक करू शकतो थोडक्यात सांगायच झाल तर कोणत्याही आकाराच्या कंपनीत संधी मिळेल तिथे गुंतवणूक करू शकतो.

फंडाची मूलभूत माहिती

Parag Parikh Flexi Cap Fund हा फंड 24 मे 2013 रोजी सुरू झाला आणि तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे inception पासून त्याने 18.14% वार्षिक परतावा दिला आहे, जो अत्यंत उल्लेखनीय आहे. हा एक open ended flexi cap fund आहे. त्याचा बेंचमार्क Nifty 500 TRI आहे. 30 मार्च 2026 रोजी या फंडाचा NAV 85.25 रुपये आहे. फंडाचा एकूण AUM म्हणजे Assets Under Management 28 फेब्रुवारी 2026 रोजी 1,34,253 कोटी रुपये इतका प्रचंड आहे, जे गुंतवणूकदारांच्या विश्वासाचे प्रतीक आहे.

परतावा किती मिळाला?

inception पासून वार्षिक परतावा 18.14% आहे. 7 वर्षांचा वार्षिक परतावा 18.64% आहे. 5 वर्षांचा वार्षिक परतावा 16.38% आहे. 3 वर्षांचा वार्षिक परतावा 17.14% आहे. हे आकडे सांगतात की हा फंड केवळ एक दोन वर्षांचा चमकदार फंड नाही, तर सातत्याने दीर्घ काळ चांगली कामगिरी करणारा फंड आहे. विशेषतः 7 वर्षांचा 18.64% परतावा हे दर्शवतो की दीर्घ काळ टिकून राहिलेल्या गुंतवणूकदारांना या फंडाने खऱ्या अर्थाने फायदा दिला आहे. मात्र हे नेहमी लक्षात ठेवावे की भूतकालीन कामगिरी भविष्यातील परताव्याची हमी देत नाही.

खर्चाचे प्रमाण आणि SIP

28 फेब्रुवारी 2026 रोजीच्या आकडेवारीनुसार या फंडाचा expense ratio केवळ 0.63% आहे. Active fund च्या दृष्टीने हे खूपच कमी आहे. दीर्घ काळात कमी expense ratio हा परताव्यावर मोठा सकारात्मक परिणाम करतो कारण जे पैसे खर्चात जात नाहीत ते compounding मध्ये काम करतात. SIP सुरू करण्यासाठी किमान 1000 रुपये प्रति महिना पुरेसे आहेत. त्यामुळे नवीन गुंतवणूकदारही सहज सुरुवात करू शकतात.

Exit Load समजून घ्या

Exit load म्हणजे फंडातून लवकर बाहेर पडण्यावर आकारला जाणारा शुल्क. या फंडात पुढीलप्रमाणे exit load आहे. जर तुम्ही 365 दिवसांच्या आत गुंतवणुकीच्या 10% पेक्षा जास्त रक्कम काढली तर 2% शुल्क आकारले जाते. जर 366 ते 730 दिवसांच्या आत काढली तर 1% शुल्क आकारले जाते. गुंतवणुकीच्या 10% पर्यंतच्या रकमेवर exit load लागत नाही. हे exit load दाखवते की हा फंड दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी बनवला आहे. जे घाईघाईत पैसे काढतात त्यांना शिक्षा आणि जे थांबतात त्यांना बक्षीस असेच या संरचनेचे तत्त्व आहे.

फंड मॅनेजर टीम

या फंडाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची अनुभवी आणि स्थिर फंड मॅनेजर टीम.

राजीव ठक्कर हे 13 मे 2013 पासून म्हणजे फंडाच्या सुरुवातीपासूनच या फंडाचे नेतृत्व करत आहेत. ते PPFAS चे मुख्य गुंतवणूक अधिकारी असून value investing चे खंदे समर्थक आहेत. राज मेहता हे 27 जानेवारी 2016 पासून फंडासोबत आहेत. रुकून तारचंदानी हे 16 मे 2022 पासून टीममध्ये आहेत. मानसी करिया 22 डिसेंबर 2023 पासून सहभागी झाल्या आहेत. ऐश्वर्या धार आणि तेजस सोमन हे दोघे 1 सप्टेंबर 2025 पासून टीमचा भाग आहेत.

इतकी मोठी आणि वैविध्यपूर्ण टीम असणे हे या फंडाच्या व्यावसायिकतेचे लक्षण आहे. एकट्या व्यक्तीवर फंड अवलंबून नाही, त्यामुळे key person risk कमी आहे.

फंडाचे वेगळेपण काय?

हा फंड केवळ भारतीय कंपन्यांमध्येच नव्हे तर Alphabet, Meta, Microsoft सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्येही गुंतवणूक करतो. त्यामुळे एकाच फंडातून जागतिक विविधीकरण मिळते. जेव्हा रुपया कमजोर होतो तेव्हा आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीतून अतिरिक्त फायदा मिळतो. फंड मॅनेजर्सनी स्वतःची रक्कम याच फंडात गुंतवली आहे, जे skin in the game चे उत्तम उदाहरण आहे.

कोणासाठी योग्य?

हा फंड त्यांच्यासाठी आदर्श आहे जे किमान 5 ते 7 वर्षांसाठी गुंतवणूक करण्यास तयार आहेत. बाजाराच्या अल्पकालीन हालचालींनी विचलित न होता शांत राहू शकणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा फंड सर्वोत्तम आहे. नवीन गुंतवणूकदार 1000 रुपये SIP पासून सुरुवात करू शकतात.

अंतिम विचार

inception पासून 18.14% परतावा, केवळ 0.63% expense ratio, 1.34 लाख कोटींचा AUM आणि 13 वर्षांपासून अनुभवी टीमचे नेतृत्व या सगळ्या गोष्टी पाहता पराग पारीख फ्लेक्सी कॅप फंड डायरेक्ट प्लॅन हा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एक मजबूत पर्याय आहे. मात्र गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतःची जोखीम सहनशीलता आणि आर्थिक उद्दिष्टे तपासा. आवश्यक वाटल्यास SEBI नोंदणीकृत आर्थिक सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्या.

हेही वाचा: Top 5 Multicap Mutual Funds: 5 वर्षांतील सर्वोत्तम SIP परतावा, जाणून घ्या नावे?

हा लेख केवळ माहितीसाठी आहे. म्युच्युअल फंड गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.

About the Author

Sajan Bhuvad Avatar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *