ITR Filing 2026 Date: नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले असून करदात्यांमध्ये ITR filing 2026 बाबत उत्सुकता वाढली आहे. १ एप्रिलपासून अनेक महत्त्वाचे नियम बदलले आहेत. त्यामुळे आयटीआर कधीपासून भरायचा, कोणता फॉर्म वापरायचा आणि अंतिम तारीख काय असेल, असे प्रश्न करदात्यांना पडले आहेत.
आयटीआर फॉर्म जारी
आयकर विभागाने २०२६ २७ या आर्थिक वर्षासाठी नवीन income tax return forms अधिसूचित केले आहेत. फॉर्म जारी झाल्यानंतर साधारणपणे लगेचच भरण्यास सुरुवात होते. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ITR filing starting date एप्रिल महिन्यातच येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयकर विभागाकडून कधीही अधिकृत सुरुवातीची घोषणा केली जाऊ शकते.
मनीकंट्रोल या आर्थिक वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, या वर्षी ITR form filling प्रक्रिया एप्रिलमध्येच सुरू होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या वर्षी मात्र आयकर कायद्यातील बदलांमुळे ही प्रक्रिया उशिराने सुरू झाली होती. यावर्षी तसे होणार नाही, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा: Gold Silver Rate Crash: सोने विक्रमी उच्चांकापेक्षा ५०,००० रुपये स्वस्त, तरीही तज्ज्ञ का म्हणतायत थांबा?
आयकर कायद्यात मोठा बदल
Income Tax Act 2025 हा १ एप्रिल २०२६ पासून लागू झाला आहे. या नव्या कायद्याने आयकर कायदा १९६१ची जागा घेतली आहे. हा बदल ऐतिहासिक मानला जात आहे. मात्र करदात्यांनी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी, ती म्हणजे २०२५ २६ या आर्थिक वर्षाचा ITR जुन्याच कायद्यांतर्गत दाखल केला जाईल. नवीन कायदा पुढील वर्षापासून आयटीआर दाखल करण्यासाठी लागू होईल.
अंतिम तारीख आणि फॉर्मचे प्रकार
ITR filing last date 2026 बाबत बोलायचे झाल्यास, दरवर्षीप्रमाणे यंदाही ३१ जुलै ही अंतिम तारीख असेल. वेतनधारक कर्मचारी, लघु व्यावसायिक, भागीदारी संस्था आणि कंपन्यांसाठी वेगवेगळे फॉर्म उपलब्ध आहेत. आयटीआर १ ते आयटीआर ७ असे एकूण सात प्रकारचे फॉर्म असून करदाते त्यांच्या उत्पन्नाच्या स्वरूपानुसार योग्य तो फॉर्म निवडू शकतात.
करदात्यांनी आत्तापासूनच तयारी करावी
income tax filing 2026 साठी वेळीच तयारी केल्यास शेवटच्या क्षणी घाई होत नाही आणि चुका टाळता येतात. फॉर्म १६, बँक स्टेटमेंट, गुंतवणुकीचे पुरावे आणि TDS संबंधित कागदपत्रे आत्तापासूनच जमा करण्यास सुरुवात करावी, असा सल्ला कर तज्ज्ञ देतात. आयकर विभागाच्या अधिकृत पोर्टलवर लवकरच online ITR filing ची सुविधा उपलब्ध होईल.
थोडक्यात, एप्रिल महिन्यातच आयटीआर भरण्यास सुरुवात होण्याची शक्यता असल्याने करदात्यांनी वेळीच तयारीला लागणे आवश्यक आहे.
रोजच्या आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या फायनान्स अपडेट्ससाठी जॉइन मराठी फायनान्स न्यूज - Whats App