नमस्कार,
मी साजन भुवड, मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील.
लहानपणापासून वाचनाची आवड होती आणि अकरावीत कॉमर्स घेतल्यानंतर फायनान्स विषयाशी ओळख झाली. मुंबईतील पाटकर वर्दे कॉलेजमध्ये पदवी शिक्षण घेत असताना म्युच्युअल फंड हा विषय अभ्यासक्रमात होता — आणि तिथूनच पर्सनल फायनान्सचा गंभीर प्रवास सुरू झाला.
वाचनाच्या प्रवासात अनेक पुस्तके वाचली, पण Morgan Housel लिखित “The Psychology of Money” या पुस्तकाने विचार करण्याची दिशा बदलली. तेव्हा एक विचार मनात आला — आर्थिक ज्ञान जर आपल्या भाषेत, सोप्या शब्दांत उपलब्ध असेल तर अधिक लोक सुजाण निर्णय घेऊ शकतील.
जून 2021 मध्ये “Marathi Finance” हे Instagram पेज सुरू केले. आज Instagram, Threads आणि Facebook मिळून 27,000+ फॉलोअर्स या प्रवासाचा भाग आहेत.
व्यावसायिक अनुभव:
सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेत बँकर म्हणून 4 वर्षे काम केल्यानंतर, सध्या ICICI Prudential Mutual Fund मध्ये Relationship Manager म्हणून कार्यरत आहे. बँकिंग आणि म्युच्युअल फंड क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभवामुळे सामान्य गुंतवणूकदारांच्या प्रश्नांची आणि अडचणींची प्रत्यक्ष जाण आहे. त्यामुळे लेखन करताना नेहमीच “सामान्य माणसाच्या दृष्टीकोनातून” विषय मांडण्याचा प्रयत्न असतो.
माझे ध्येय साधे आहे — फायनान्स भीतीदायक नाही, तो समजण्यासारखा आहे हे दाखवून देणे. लवकर गुंतवणूक सुरू करण्याची सवय निर्माण करणे. आणि प्रत्येक मराठी कुटुंब आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम व्हावे यासाठी योगदान देणे.
या प्रवासात तुम्ही सोबत आहात, याबद्दल मनापासून धन्यवाद.
नवीन लेख, टिप्स आणि अपडेट्स थेट मिळवण्यासाठी आम्हाला Instagram वर फॉलो करा.