Mutual Fund SWP: ₹5,000 च्या SIP पासून पुढे ₹1 लाख महिन्याची इन्कम कशी तयार होऊ शकते?
Mutual Fund: समजा तुमचे वय 30 वर्षे आहे आणि तुम्ही दर महिन्याला ₹5,000 ची SIP सुरू करता. दरवर्षी तुम्ही तुमची SIP 7% ने वाढवली, तर 30 वर्षांच्या कालावधीत तुमची एकूण गुंतवणूक सुमारे ₹56.68 लाख होईल. येथे 7% वार्षिक वाढीचा उद्देश असा आहे की तुमची गुंतवणूक वाढत असताना महागाईच्या वाढीशीही काही प्रमाणात जुळवून घेता यावे. (तुम्ही हव तर SIP रक्कम 10% किंवा जास्त टक्क्याने वाढवू शकता)
30 वर्षांनंतर किती रक्कम तयार होऊ शकते?
या उदाहरणासाठी आपण दीर्घकालीन गुंतवणुकीवर 12% वार्षिक परतावा गृहीत धरला, तर 30 वर्षांनंतर तुमची रक्कम सुमारे ₹2.85 कोटी होऊ शकते. यातील ₹56.68 लाख ही तुमची प्रत्यक्ष गुंतवणूक असेल, तर उर्वरित रक्कम बाजारातील परताव्यामुळे तयार झालेली संपत्ती असेल. प्रत्यक्ष परतावा यापेक्षा कमी किंवा जास्त असू शकतो. (खर बोलू तर जास्तच परतावा मिळेल, कमी नाही होणार एवढ्या लॉन्गटर्ममध्ये.)
Mutual Fund: रिटायरमेंटनंतर दर महिन्याला पैसे कुठून आणणार? SIP आणि SWP चं हे गणित समजून घ्या!
आता SWP सुरू करूया
समजा निवृत्तीच्या काळात तुम्ही या रकमेपैकी ₹2 कोटी SWP साठी ठेवले आणि उर्वरित रक्कम म्हणजे 85 लाख तुलनेने सुरक्षित पर्यायांमध्ये ठेवली. आता तुम्हाला दर महिन्याला ₹1 लाख हवे आहेत, असे गृहीत धरूया. 30 वर्षांनंतरच्या खर्चाचा विचार करता आजच्या तुलनेत मोठ्या रकमेची गरज असू शकते, त्यामुळे Retirement Planning करताना Inflation चा विचार करणे महत्त्वाचे आहे.
₹2 कोटींमधून दर महिन्याला ₹1 लाख काढल्यास काय होईल?
या उदाहरणात आपण 9% वार्षिक परतावा गृहीत धरत आहोत. हा फक्त गणनेसाठी घेतलेला अंदाज आहे; Mutual Fund मधून 9% परतावा मिळेलच अशी कोणतीही हमी नाही. ₹2 कोटींमधून दर महिन्याला ₹1 लाख काढले आणि 30 वर्षे हीच रक्कम काढत राहिलो, तर एकूण ₹3.60 कोटी काढले जातील.
30 वर्षांनंतर किती रक्कम शिल्लक राहू शकते?
₹2 कोटींच्या गुंतवणुकीवर दरवर्षी 9% परतावा आणि दर महिन्याला ₹1 लाखाची नियमित रक्कम काढण्याचे गृहीत धरल्यास, 30 वर्षांनंतर अंदाजे ₹11.15 कोटी शिल्लक राहू शकतात. म्हणजेच ₹3.60 कोटींची रक्कम काढल्यानंतरही गुंतवणुकीत मोठी रक्कम राहण्याची शक्यता दिसते.
हे उदाहरण काय सांगते?
यातून एक महत्त्वाची गोष्ट समजते: Retirement Planning फक्त निवृत्तीनंतर पैसे काढण्यापुरते मर्यादित नसते. कमाईच्या काळात SIP च्या माध्यमातून मोठी संपत्ती तयार करणे आणि नंतर SWP च्या माध्यमातून त्या संपत्तीमधून नियमित रक्कम घेणे, अशी दीर्घकालीन योजना करता येते. योग्य नियोजन केले तर तुमची गुंतवणूक तुमच्या Retirement Income चा एक स्रोत बनू शकते.
Disclaimer: ही माहिती केवळ शैक्षणिक उद्देशाने आहे. Mutual Fund मधील परतावा बाजारातील परिस्थितीवर अवलंबून असून कोणत्याही परताव्याची हमी नाही. 9% आणि इतर आकडे केवळ उदाहरणासाठी घेतले आहेत.







