Gold Silver rate Today: सोने आणि चांदीच्या दरात गेल्या आठवड्यात चढ-उतार पाहायला मिळाले. सुरुवातीला घसरण झाल्यानंतर आता पुन्हा दरात वाढ होताना दिसत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार सोने आणि चांदीसारख्या सुरक्षित पर्यायांकडे वळत आहेत, त्यामुळे दरांवर दबाव येत आहे.
चांदी आता 2 लाखांनी स्वस्त | Silver Rate Today India
एमसीएक्स (Multi Commodity Exchange) वर शुक्रवारी 5 मे रोजी संपणाऱ्या वायद्यानुसार (silver Future) चांदीचा दर 227750 रुपये प्रति किलो होता. 20 मार्च रोजी हाच दर 226772 रुपये होता म्हणजेच अवघ्या चार दिवसांत चांदी 978 रुपयांनी महाग झाली आहे.
जानेवारी महिन्यात चांदीच्या दराने 4 लाखांचा उच्चांक गाठला होता. एमसीएक्सवरील ऑल-टाइम हाय 439337 रुपये प्रति किलो इतका होता. त्या तुलनेत सध्या चांदी 211587 रुपयांनी स्वस्त उपलब्ध आहे. हे दोन लाखांहून अधिक आहे.
सोन्याचे दर | Gold Rate Today MCX
एमसीएक्सवर 2 एप्रिलच्या वायद्यानुसार 20 मार्च रोजी सोन्याचा दर 147987 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. त्या तुलनेत 27 मार्च रोजी सोन्याचा दर 147270 रुपये झाला, म्हणजेच चार दिवसात सोने 717 रुपयांनी स्वस्त झाले. सोन्याचा ऐतिहासिक उच्चांक 202984 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. सध्याचा दर पाहता सोने त्या उच्चांकाच्या तुलनेत 55714 रुपयांनी कमी आहे.
देशांतर्गत बाजारातील दर | IBJA Gold Silver Price Today
आयबीजेए (IBJA – India Bullion & Jewellers Association) कडून जारी केलेल्या दरांनुसार, चार दिवसांत 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 4276 रुपयांची घसरण झाली. सोन्याचा दर 147218 रुपयांवरून 142942 रुपयांवर आला. चांदीने मात्र वेगळी वाट धरली. 232364 रुपयांवरून 10717 रुपयांनी घसरून 221647 रुपयांवर आली.
कॅरेटनिहाय सोन्याचे दर | Gold Rate per Tola by Carat
| कॅरेट | दर (प्रति तोळा / 10 ग्रॅम) |
|---|---|
| 24 कॅरेट | ₹ 1,42,942 |
| 22 कॅरेट | ₹ 1,39,510 |
| 20 कॅरेट | ₹ 1,27,220 |
| 18 कॅरेट | ₹ 1,15,780 |
| 14 कॅरेट | ₹ 92,220 |
दागिने खरेदी करताना लक्षात ठेवा | Gold Jewellery Buying Tips India
आयबीजेएकडून जारी होणारे सोने-चांदीचे दर संपूर्ण देशात सारखेच असतात. मात्र, दागिने खरेदी करताना त्यावर GST आणि Making Charges वेगळे आकारले जातात. हे चार्जेस शहरागणिक वेगळे असू शकतात त्यामुळे तुमच्या शहरातील दर थोडा वेगळा असू शकतो.
वाचा: New Rental Rules 2026: भाडेकरूंसाठी मोठा दिलासा की मालकांसाठी नवे नियम?