Best SIP Date: SIP साठी सर्वोत्तम तारीख कोणती?

SIP Investment साठी Best SIP Date आणि frequency बद्दल गुंतवणूकदारांचा एक सामान्य प्रश्न असतो. अनेक गुंतवणूकदारांना वाटते की महिन्याची एखादी विशिष्ट तारीख किंवा विशिष्ट frequency..

Best SIP Date

SIP Investment साठी Best SIP Date आणि frequency बद्दल गुंतवणूकदारांचा एक सामान्य प्रश्न असतो. अनेक गुंतवणूकदारांना वाटते की महिन्याची एखादी विशिष्ट तारीख किंवा विशिष्ट frequency त्यांचे परतावे (returns) वाढवू शकते. पण खरंच असं होतं का? चला सखोल विश्लेषण करूया.

विश्लेषण

यासाठी आम्ही Zerodha Fund House च्या analysis चा वापर केला. यामध्ये ३ वेगवेगळ्या निर्देशांकांचा (indices) १८ वर्षांहून अधिक कालावधीचा अभ्यास केला आहे. Best SIP Date समजण्यासाठी महिन्याच्या ३१ वेगवेगळ्या तारखांसाठी scenario analysis केले आहेत म्हणजे एखादी व्यक्ती दर महिन्याला त्याच तारखेला या तीन निर्देशांकांमध्ये गुंतवणूक करते असे गृहीत धरले. परिणाम खालीलप्रमाणे आहेत:

SIP Returns वेगवेगळ्या तारखांनुसार (Best SIP Date Analysis April 2005 ते March 2024):

SIP तारीखNifty LargeMidcap 250 – TRI (XIRR %)Nifty Midcap 150 – TRI (XIRR %)Nifty 100 – TRI (XIRR %)
115.8117.8313.75
215.8017.8213.74
315.7917.8113.73
415.7717.7913.72
515.7817.7913.73
615.7917.8013.74
715.8017.8113.75
815.8217.8313.76
915.8117.8313.75
1015.8017.8213.74
1115.8117.8313.76
1215.8317.8413.77
1315.8217.8313.76
1415.8117.8313.75
1515.8117.8213.75
1615.8117.8213.75
1715.8317.8513.76
1815.8317.8513.76
1915.8317.8513.77
2015.8417.8613.77
2115.8417.8613.77
2215.8617.8913.79
2315.8617.8913.79
2415.8817.9113.80
2515.8617.9013.78
2615.8617.9013.78
2715.8617.9013.78
2815.8517.8913.77
2915.8117.8413.74
3015.8117.8413.73
3115.7917.8313.71

SIP Returns वेगवेगळ्या Frequencies नुसार (April 2005 ते March 2024):

निर्देशांक (Index)XIRR – Daily (%)XIRR – Weekly (%)XIRR – Quarterly (%)XIRR – Half-Yearly (%)
Nifty LargeMidcap 250 – TRI15.8215.8215.8715.91
Nifty Midcap 150 – TRI17.8417.8417.9017.92
Nifty 100 – TRI13.7613.7513.8113.86

वरील तक्त्यावरून स्पष्ट होते की Daily SIP असो, Weekly SIP असो, Quarterly SIP असो किंवा Half-Yearly SIP यामध्ये परताव्यातील फरक अत्यंत नगण्य आहे. उदाहरणार्थ, Nifty Midcap 150 मध्ये Daily SIP चा XIRR १७.८४% आहे तर Half-Yearly SIP चा फक्त १७.९२% आहे म्हणजे जवळपास ०.०८% एवढाच फरक! त्यामुळे Best SIP Frequency शोधण्यात वेळ न घालवता, जी frequency तुम्हाला सोयीची वाटेल ती निवडा.

गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा संदेश:

Best SIP Date किंवा SIP Frequency बद्दलच्या गोंधळात न पडता गुंतवणूकदारांनी खालील गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे:

  • जी तारीख आणि frequency तुम्हाला सोयीची वाटेल, त्याच दिवशी SIP सुरू करा.
  • सहसा गुंतवणूकदार आपली SIP तारीख त्यांच्या cash flow शी जुळवतात, जेणेकरून बँक खात्यात पैसे उपलब्ध असतात याची काळजी करावी लागत नाही.

उदाहरणार्थ:

  • पगारदार व्यक्ती: पगार जमा झाल्यानंतर २-३ दिवसांनी SIP ची तारीख ठेवावी.
  • भाडे उत्पन्न असलेली व्यक्ती: भाडे येण्याच्या तारखेशी SIP जुळवावी.
  • व्यावसायिक: व्यवसायाच्या cash flow नुसार तारीख आणि frequency निवडावी.

निष्कर्ष

वरील विश्लेषणावरून हे स्पष्ट होते की Best SIP Date किंवा Best SIP Frequency ठरवणे फारसे महत्त्वाचे नाही. कोणत्याही विशिष्ट तारखेला किंवा विशिष्ट frequency ने केलेल्या गुंतवणुकीत परताव्यात नगण्य फरक आढळतो. किमान गेल्या १८+ वर्षांचा डेटा तरी हेच सांगतो की कोणतीही एक तारीख इतरांपेक्षा लक्षणीयरीत्या चांगली नाही.

वाचा: Best Mid Cap Funds: या 3 फंड्स नी दिला जबरदस्त रिटर्न, संपूर्ण माहिती एका नजरेत

About the Author

Sajan Bhuvad Avatar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *