Mutual Fund SIP: ₹10,000 ची SIP आणि ₹11.71 कोटींचा फंड! हा हिशोब समजून घ्या
भविष्यासाठी मोठा Corpus तयार करण्याचा विचार करत असाल, तर Mutual Fund SIP हा दीर्घकालीन गुंतवणुकीचा एक पर्याय ठरू शकतो. विशेषतः नियमित SIP सोबत दरवर्षी गुंतवणुकीची रक्कम वाढवली, तर दीर्घकाळात मोठा Corpus तयार होऊ शकतो. उदाहरणार्थ, दर महिन्याला ₹10,000 पासून सुरुवात करून दरवर्षी SIP मध्ये 10% वाढ केली, तर 32 वर्षांच्या कालावधीत ₹11 कोटींपेक्षा जास्त Corpus तयार होऊ शकतो.
₹11 कोटींसाठी काय करावे लागेल?
यासाठी केवळ ₹10,000 ची Fixed SIP पुरेशी ठरणार नाही. त्यासोबत Step-Up SIP करणे महत्त्वाचे आहे. Step-Up SIP म्हणजे दरवर्षी आपल्या SIP ची रक्कम ठराविक टक्क्यांनी वाढवणे. उदाहरणार्थ, पहिल्या वर्षी ₹10,000 ची SIP असेल तर पुढील वर्षी ती 10% वाढवून ₹11,000 करता येईल. त्यानंतर दरवर्षी याच पद्धतीने SIP वाढवत जाता येते.
₹10,000 SIP चे पूर्ण कॅल्क्युलेशन
या उदाहरणात खालील गृहीतके घेतली आहेत:
- सुरुवातीची Monthly SIP: ₹10,000
- Annual Step-Up: 10%
- Investment Period: 32 वर्षे
- Assumed Return: 12% वार्षिक
- एकूण गुंतवणूक: अंदाजे ₹2.41 कोटी
- अंदाजे Corpus: ₹11.71 कोटी
म्हणजेच, सुरुवातीला दर महिन्याला ₹10,000 ची SIP करताना दरवर्षी गुंतवणुकीची रक्कम 10% ने वाढवली, तर दीर्घकालीन चक्रवाढीच्या परिणामामुळे मोठा Corpus तयार होऊ शकतो.
Step-Up SIP का महत्त्वाची आहे?
तुमचे उत्पन्न वाढत असेल, तर गुंतवणुकीची रक्कमही हळूहळू वाढवणे शक्य होते. यामुळे सुरुवातीला मोठी रक्कम गुंतवण्याची गरज नसते. उदाहरणार्थ, नोकरीच्या सुरुवातीला ₹10,000 ची SIP सुरू करून उत्पन्न वाढल्यानंतर दरवर्षी SIP वाढवता येते. यामुळे Wealth Creation, Retirement Planning किंवा भविष्यातील मोठ्या आर्थिक उद्दिष्टांसाठी अधिक मोठा Corpus तयार करण्याचा प्रयत्न करता येतो.
पण एक गोष्ट लक्षात ठेवा
वरील ₹11.71 कोटींचा Corpus हा 12% वार्षिक परताव्याच्या गृहीतकावर आधारित अंदाज आहे. Mutual Fund मधील परतावा निश्चित किंवा हमीचा नसतो. प्रत्यक्षात मिळणारा परतावा बाजारातील परिस्थिती, निवडलेली योजना आणि गुंतवणुकीच्या कालावधीनुसार बदलू शकतो. त्यामुळे केवळ या कॅल्क्युलेशनवर आधारित गुंतवणुकीचा निर्णय घेऊ नये.
Disclaimer: हा लेख केवळ शैक्षणिक आणि माहितीच्या उद्देशाने आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला किंवा शिफारस नाही. Mutual Fund गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. कोणत्याही फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या Financial Advisor चा सल्ला घ्या.







