Silent Authentication: OTP टाकण्याआधीच बँकेला कळेल व्यवहार खरा आहे की फसवणूक, भारतात येतय ‘सायलेंट ऑथेंटिकेशन’ तंत्रज्ञान!
Silent Authentication: भारतातील प्रमुख खाजगी बँका आणि दूरसंचार कंपन्या डिजिटल पेमेंट सुरक्षेच्या क्षेत्रात एक मोठा बदल घडवून आणण्याच्या तयारीत आहेत. ‘सायलेंट ऑथेंटिकेशन’ या नव्या तंत्रज्ञानामुळे ऑनलाइन व्यवहारांसाठी वन टाइम पासवर्ड म्हणजेच OTP ची आवश्यकता भविष्यात राहणार नाही. यामुळे डिजिटल फसवणूक रोखणे अधिक सोपे होणार आहे आणि वापरकर्त्यांचा ऑनलाइन पेमेंटचा अनुभवही सुलभ होणार आहे. सायलेंट ऑथेंटिकेशन…

