कंपनीचा Health Insurance आहे म्हणून निश्चिंत आहात? ही चूक महागात पडू शकते!
Corporate vs Personal Health Insurance: नोकरी लागल्यानंतर कंपनीकडून Health Insurance मिळालं की आपल्याला एक प्रकारची सुरक्षितता वाटते. “कंपनीने ४-५ लाखांचा विमा दिलाय, मग वेगळा Health Insurance कशाला घ्यायचा?” माझ्याही मनात अगदी हाच विचार होता. Graduation झाल्यानंतर माझी पहिली नोकरी Saraswat Bank मध्ये लागली. तिथे मला कंपनीकडून Bajaj Allianz चा ₹5 लाखांचा Corporate Health Insurance मिळाला…












