RBI Policy Impact: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) कठोर पावले उचलल्यामुळे रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत लक्षणीयरित्या सुधारले आहे. गुरुवारच्या सत्रात एका डॉलरचा भाव 92.83 रुपयांवर आला. ही रुपयाची गेल्या 13 वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी आहे.
RBI च्या कठोर उपाययोजना
रिझर्व्ह बँकेने सर्वच बँकांना कोणत्याही ग्राहकांना Rupee Non-Deliverable Forwards देऊ करण्यावर बंदी घातली. तसेच रद्द झालेल्या Forward Contracts च्या रिबुकिंगवरही बंदी घालण्यात आली. विश्लेषकांच्या मते गेल्या दशकातील ही सर्वात कठोर उपाययोजना आहे.
Rupee Dollar Rate मध्ये मोठी सुधारणा
मागील सत्रात एका डॉलरच्या तुलनेत रुपया नीचांकी 95.21 पातळीवर गेला होता. RBI च्या हस्तक्षेपामुळे गुरुवारच्या सत्रात एका डॉलरचा भाव 92.83 रुपयांवर आला. बाजार बंद होताना एका डॉलरचा भाव 93.10 रुपयांवर बंद झाला. एका दिवसात रुपया तब्बल 171 पैशांनी वधारला. RBI च्या हस्तक्षेपामुळे का असेना, रुपयाची ही गत 13 वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
Sensex Nifty मध्ये किरकोळ वाढ
गुरुवारी सकाळच्या सत्रात Sensex आणि Nifty निर्देशांकांत तीन अंकांनी पडझड झाली. मात्र दुपारच्या सत्रात Banking, IT आणि Finance क्षेत्रातील बलाढ्य कंपन्यांमधील गुंतवणूक वाढल्याने Sensex दिवसभराच्या नीचांकावरून 185 अंकांनी आणि Nifty 33 अंकांनी वाढला. Sensex 0.25 टक्क्यांच्या वाढीसह 73,319 अंकांवर विसावला.
सोने आणि चांदी स्वस्त
जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत गुरुवारी सोन्यात ₹4,738 ची घट नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर GST सह प्रति 10 ग्रॅम ₹1,51,204 पर्यंत घसरले. चांदीच्या दरात ₹12,360 ची घट झाल्याने GST सह प्रति किलो ₹2,41,020 पर्यंत भाव घसरले.
Crude Oil Price 100 डॉलर्सपार
इंधन पुरवठा सुरळीत होण्याची साशंकता कायम असल्याने Crude Oil च्या भावात गुरुवारी 8 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. Brent Crude Oil चा भाव 8.09 टक्क्यांनी वाढून 109 डॉलर्स प्रति बॅरलवर गेला. US WTI Crude चा भाव 108 डॉलर्स प्रति बॅरल झाला.
वाचा: Gold Silver Price Today: सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, MCX वर भाव कोसळले!