About us

Marathi Finance हा एक मराठी पर्सनल फायनान्स ब्लॉग आहे, ज्याचा उद्देश एकच आहे — आर्थिक विषय सोप्या भाषेत, स्पष्ट उदाहरणांसह आणि कोणताही अनावश्यक गुंता न ठेवता समजावून सांगणे.

आजही अनेक मराठी कुटुंबांमध्ये शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, हेल्थ इन्शुरन्स, लाइफ इन्शुरन्स किंवा गुंतवणूक या विषयांबद्दल भीती, गैरसमज किंवा अपुरी माहिती आहे. Marathi Finance हा अंतर भरून काढण्यासाठी तयार झाला आहे.

येथे आम्ही खालील विषयांवर सविस्तर आणि अभ्यासपूर्ण लेख प्रकाशित करतो:

  • म्युच्युअल फंड (SIP,SWP, STP)
  • शेअर मार्केट मूलभूत माहिती
  • हेल्थ आणि लाइफ इन्शुरन्स मार्गदर्शन
  • आर्थिक नियोजन (Financial Planning)
  • कर बचत (Tax Planning)
  • नवशिक्यांसाठी गुंतवणूक मार्गदर्शक

आमचे उद्दिष्ट फक्त माहिती देणे नाही, तर आर्थिक निर्णय घेताना आत्मविश्वास निर्माण करणे आहे.

सोशल मीडियावर 27,000+ वाचकांचा विश्वास मिळाल्यानंतर, अधिक सविस्तर माहिती देण्यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला. प्रत्येक लेखामध्ये स्पष्टता, प्रामाणिकपणा आणि दीर्घकालीन दृष्टीकोन याला प्राधान्य दिले जाते.

Marathi Finance हे केवळ एक ब्लॉग नाही — ही आर्थिक साक्षरतेची चळवळ आहे. (जरा जास्तच झाल. पण जे आहे ते आहे!)